मुंबई : आयएनएस विक्रांत ही युद्धनौका जतन करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निधी संकलनाचा उपक्रम २०१३ – १४ मध्ये सुरु केले होते. या उपक्रमातून जमा झालेला निधी राज्यपालकडे देणार असल्याचे सोमय्या यांनीं जाहिर केले होते. मात्र हा निधी राज्यपालकडे कधीच सुपूर्द केले नसल्याची माहिती अधिकारातून उघड झाले आहे. आता या आर्थिक सहाय्यता निधीचा अपहार केल्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्यावर कलम ४०६, ४२०, ३४ भारतीय दंड विधान कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान हा आयएनएस विक्रांत घोटाळा ५८ कोटींच्या घरात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. या सगळ्या आरोपांवर किरीट सोमय्या यांनी अजूनही स्पष्टीकरण दिलेले नाही. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी या संबंधीत प्रश्नांना बगल दिली होती.
आज सोमय्या यांची एक जुनी फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट १३ डिसेंबर २०१३ रोजी सोमय्या यांनी केली होती. यात ते म्हणत आहेत की, “आपण राज्यपालांना भेटलो आहोत. राज्यपालांना विक्रांत नौका वाचवण्यासाठी विनंती केली आहे. तसेच ‘विक्रांत शहिद स्मारक’ उभारण्यासाठी मुंबईकर १४० कोटी रुपयांची देणगी देण्यासाठी तयार आहेत”
त्यामुळे हा घोटाळा तब्बल १४० कोटींचा असल्याच्या चर्चा होत आहे.
महत्वाच्या बातम्या :


