Share

…तर एमपीएससीच्या अध्यक्षाची गाढवावरुन धिंड काढू : गोपीचंद पडळकरांचा इशारा

Published On: 

मुंबई : भाजपचे नेते व विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना इशारा दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेत अफरातफर झाल्याचा आरोप भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. जर पुन्हा अशी अफरातफर झाली तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची गाढवावर बसून धिंड काढू, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यात राज्य सरकार PSI च्या ६०५ जागा भरणार असल्याचे नमूद केलं आहे. त्यानुसार NT प्रवर्गासाठी साडेतीन टक्क्याने २२ जागा असणं गरजेचं आहे. पण त्यात फक्त २ जागा NT प्रवर्गासाठी दिल्या आहे. त्यामुळे उरलेल्या २० जागा कुठे गेल्या? असा प्रश्न गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला आहे.

गोपीचंद पडळकर हे सध्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे कैवारी आहेत असे म्हणले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. १४ मार्च रोजी होणारी एमपीएससी कडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी गोपीचंद पडळकर हे सर्वप्रथम पुण्यामध्ये काही विद्यार्थ्यांना घेवून आंदोलनाला बसले होते.

त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यभर पेटलेले होते. त्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. बऱ्याच गोंधळानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ही तारीख आठवड्याभरातलीच असेल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली.

याच आंदोलनाची दखल घेवून एमपीएससीची परीक्षा २१ मार्च रोजी घेण्यात आलेली होती. हा निर्णय म्हणजे गोपीचंद पडळकर याचं मोठ यश असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केल्या होत्या. यामुळेच सध्या पडळकर एमपीएससीच्या विध्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!