Share

‘…म्हणून सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेवा’; मुख्यमंत्री ठाकरेंच आवाहन

Published On: 

मुंबई : कोरोना रोगाने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना हा पूर्णपणे आटोक्यात येत असला तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक नियम पाळून, गोविंदांचे लसीकरण करून अटींसह दहीहंडी उत्सव साजरा करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी गोविंदा पथकांनी राज्य सरकारकडे केली होती. याबाबत आज गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी, ‘जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा,’ असं आवाहन या गोविंदा पथकांना केलं आहे. त्यामुळे यंदा देखील दहीहंडी उत्सवास परवानगी नसेल असे संकेत मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलेत.

मुख्यमंत्री ठाकरेंनी नेमका काय इशारा दिला ?

‘बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षी पासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. इस्त्रायलने तर पुन्हा मास्क घालायला सुरवात केलीय. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोट आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतलांय. आपण जर समजूतीने वागलो नाही तर धोका अटळ आहे,’ अशी भीती वजा इशारा मुकभ्यमंत्री ठाकरे यांनी या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झालेल्या बैठकीत व्यक्त केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!