जालना : कोरोनाची तिसरी लाट येणार असा धोका नीती आयोगाने व्यक्त केल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला आवाहन केले आहे.
नीती आयोगाचा अलर्ट आजचा नाही, केंद्राला आलेले पत्र जून महिन्यातील आहे. सध्या राज्याला कुठलाही इशारा नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. तिसऱ्या लाटेसंदर्भात राज्याची तयारी पूर्ण झाली आहे. नागरिकांनी घाबरु नये, असं आवाहन राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.
आरोग्य विभागातील रिक्त जागांची भरती, ऑक्सिजन, मेडिसिन तसेच लहान मुलांच्या आरोग्य संबंधीची तयारीही पूर्ण केली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
साधारण पुढच्या महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अरे बाप्पा सिस्टर…….हळू!; रावसाहेब दानवेंवर काँग्रेसचा पलटवार
- पाकिस्तानी फवाद आलमने रचला इतिहास ; अशी कामगिरी करणारा आशियाचा पहिलाच फलंदाज
- मोठी बातमी : मंत्रालयाबाहेर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी सुभाष जाधव यांचा मृत्यू
- शहरात लसीकरणाला प्रतिसाद ; पावणे सात लाख जणांचे लसीकरण
- …म्हणून राज्यभरातील सुवर्णकारांनी आज उपसले आहे संपाचे हत्यार


