Share

‘…तर ते थांबलच पाहिजे’; गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’वर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

पुणे : केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वात कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. कोरोना काळात देखील त्यांनी महाराष्ट्रासाठी खास प्रयत्न करून संकटात मोठी मदत केली होती. तर, त्यांच्या रस्ते बांधणीच्या विक्रमी नोंदीमुळे ते आता ‘रोडकरी’ म्हणून ओळखले जात आहेत. फारसे कधी न संतपणारे गडकरी आता मात्र शिवसेनेच्या दहशत पसरवणाऱ्या कारवायांमुळे चांगलेच संतापले आहेत.

इतकंच नाही तर त्यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून कारवाईचा इशारा देखील दिला आहे. काल हे पत्र बाहेर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ‘काल ही बातमी वाचली. आता तो आरोप आहे. त्यात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावं लागेल. मी 30-40 वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात आहे. मी नेहमी सांगतो हा जनतेचा पैसा असतो. त्याचा विनियोग व्यवस्थित झाला पाहिजे,’ असं पवार म्हणाले.

यासोबतच, ‘कामाचा दर्जा चांगला राखला पाहिजे. तो राखला जात नसेल तर संबंधित कंत्राटदारावर कारवाई केली पाहिजे. जर यदाकदाचित कंत्राटदार त्या भागात चांगलं काम करत असताना काही जण कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेऊन किंवा कुठल्या तरी मिळवलेल्या पदाचा आधार घेऊन कुणाला त्रास देत असेल तर तो त्रास ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. म्हणून गडकरींनी मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचं पत्रं दिलं आहे,’ असं देखील पवार यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!