🕒 1 min read
औरंगाबाद : ई-पीक पाहणी, स्मार्ट सिटी प्रकल्प, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन, पाणी पुरवठा प्रकल्प योजना, अशा सर्व उपकमांची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी झालेली आहे. यासह अनेक नवनविन योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून जिल्ह्याने उत्तरोत्तर विकास साध्य करावा अशा शुभेच्छा स्वातंत्र्यदिना निमित्त पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, ‘कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा विचार करता जिल्ह्यामध्ये सर्व यंत्रणा तत्पर ठेवण्यात आलेल्या आहेत. घाटीमध्ये कोविड रुग्णसेवेकरीता ८५० ऑक्सिजन बेड, १५० आयसीयू बेड तर ११० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सध्या २ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. तालुकास्तरावर ३३ कोविड केअर सेंटर तर ग्रामीण भागात गंभीर रुग्णांसाठी २५ डीसीएचसी सुरू करण्यात आलेल्या आहेत.
मनपाने तयार केलेले ‘माझे आरोग्य माझ्या हाती’ हे ॲप तर देशभरात अनुकरणीय ठरले आहे. पोस्ट कोविड होम आयसोलेशन मधील रुग्णांच्या पाठपुराव्यासाठी कॉल सेंटर कार्यरत आहे. मनपाचे बालरोग कोविडसाठी एमजीएम स्पोर्टस, गरवारे स्टेडियम, मेल्ट्रॉन डिसीएचसी येथे उपलब्ध असून मातृत्व कोविड सेंटरही सज्ज असल्याचे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- प्रधानमंत्री आवास योजनेच्या थकीत निधीसाठी थेट पंतप्रधानांना पत्र
- ‘आजपासून २५ वर्षांनी जे कोणी पंतप्रधान असतील…’
- ‘मला अजितदादाही १२ आमदारांबद्दल बोलत नाहीत, तुम्ही कोण विचारणारे?’ राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले
- ‘जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका’, स्वातंत्र्यदिनी मोदींची मोठी घोषणा
- कोरोना संकटातील भारताची लढाई हा जगभरात चर्चेचा विषय-पंतप्रधान मोदी

