मुंबई : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट आली असल्याने दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर, आज (२८ मार्च) होळीचा सण असल्याने उत्साहाच्या भरात कोरोनाला निमंत्रण मिळू नये म्हणून आरोग्य प्रशासन सावध झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
तर, परस्परांची आणि पर्यावरणाची काळजी घेत, येणारे होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावेत. सण-उत्सवाचा आनंद हा परस्परांविषयी, निसर्गाविषयी आदर वाढवण्यासाठी असतो. या सणांकडून प्रेरणा घेऊन कोरोना विषाणूला रोखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन करूया, असे आवाहन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला होळी, धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ठाकरे सरकारने महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सार्वजनिक तसंच खासगी पद्धतीने होळी, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यावर भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचे सरकार आहे की मुस्लिम लीगचे? असा घणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे.
अतुल भातखळकर यांच्या या टीकेला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘भाजपा हा हिंदू विरोधी पक्ष आहे हे स्पष्ट आहे. अधिकाधिक हिंदूना कोरोना व्हावा ही यांची संघी मानसिकता आहे. उपचारांचा खर्च भाजपा वाल्यांचे पूज्य पिताश्री देणार का? आणि मेलात तर? ही लोकं आपल्या कोरोना झालेल्या संघातील लोकांच्या अंत्यसंस्कारालाही जात नाहीत मग तुमच्या कुठं यायचे!’ अशी विखारी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
भाजपा हा हिंदू विरोधी पक्ष आहे हे स्पष्ट आहे. अधिकाधिक हिंदूना कोरोना व्हावा ही यांची संघी मानसिकता आहे.
उपचारांचा खर्च भाजपा वाल्यांचे पूज्य पिताश्री देणार का? आणि मेलात तर? ही लोकं आपल्या कोरोना झालेल्या संघातील लोकांच्या अंत्यसंस्कारालाही जात नाहीत मग तुमच्या कुठं यायचे! https://t.co/c5chFrjEVC— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 28, 2021
काय म्हणाले होते भातखळकर ?
‘शब्बे बारातला मर्यादित लोकांच्या उपस्थितीत परवानगी आणि होळीच्या सणाला पूर्णपणे बंदी या ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला भारतीय जनता पार्टीचा पूर्ण विरोध आहे. होळी आमच्या श्रद्धेचा आणि भावनेचा प्रश्न आहे. मर्यादित संख्येत उपस्थित राहून आज मुंबईभर होळी प्रत्येकाने आपआपल्या श्रद्धेप्रमाणे साजरी करावी. हे भारतीय जनता पार्टीचे आवाहन आहे. हा आमचा निर्णय आहे आणि हिम्मत असेल तर ठाकरे सरकारने पोलिसांना सांगून आमच्यावर कारवाई करून दाखवावी.’ असं आव्हान भातखळकर यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमित शाहांना जे सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलंय; शाह-पवार भेटीनंतर भाजप नेत्याचं सूचक विधान
- लॉकडाऊनबाबत ‘या’ तारखेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात; राजेश टोपेंचा इशारा
- भांडुप ड्रीम्स मॉल आगीतील नुकसानग्रस्तांना शासनाने त्वरित भरपाई द्यावी – आठवले
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

