मुंबई : राज्यात राष्ट्रवादी,शिवसेना आणि कॉंग्रेस हे एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. मात्र गेल्या काही दिवसांपासून सचिन वाझे प्रकरण परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब यामुळे सरकार कुठेतरी अडचणीत आले आहे. यावरून महाविकास आघाडीत खटके उडायला सुरवात झाली आहे. अशातच गुजरातमधून राज्याच्या राजकारणाला हलवून टाकणारी एक बातमी समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अहमदाबादमधील फार्महाऊसवर 26 मार्चच्या रात्री 9.30 वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही त्यावेळी अहमदाबादेतच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.
दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती एका गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे
राष्ट्रवादी काँग्रेसने हे वृत्त फेटाळून लावले असून राज्यातील विविध नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, आता या भेटीवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मोजक्याच शब्दांत सूचक भाष्य केलं आहे. ‘अमित शाह हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. याबाबत त्यांनी जे काय सुचवायचं होतं ते त्यांनी सुचवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र ही भेट नाकारल्याने आता सस्पेन्स निर्माण झाला आहे,’ असं दरेकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- रिषभ पंतच्या झुंजार खेळीने इंग्रजांची दाणादाण ! मात्र…
- लॉकडाऊनबाबत ‘या’ तारखेनंतर मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकतात; राजेश टोपेंचा इशारा
- भारत आणि इंग्लड वनडे सामन्यात विराटने केला ‘हा’ विक्रम !
- महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मिठाचा खडा टाकू नये; अजितदादांनी राऊतांना झापलं
- ‘मन की बात’ कार्यक्रमात मोदींकडून खेळाडूंचं कौतुक


