Share

स्मृती मंधानाचा अफलातून कॅच ; व्हिडिओ होतोय व्हायरल

Published On: 

इंग्लंड : भारतीय महिलांची क्रिकेट टीम आणि भारतीय पुरुष टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहेत. सध्या भारतीय महिला टीम आणि इंग्लंड महिला टीम यांच्यामध्ये तिसरी वन-डे मॅच सुरू आहे. तिसऱ्या वन-डे मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने प्रथम बॅटिंग करत 219 धावांच लक्ष दिलं. यामध्ये नताली सायवरने 49 रन्सची इनिंग खेळली आणि हिथर नाइटने 46 रन्सची इनिंग खेळली. या व्यतिरिक्त लॉरेन विनफील्डने 36 रन्स केल्या.

या मॅचमध्ये भारतीय महिला बॉलर्सने उत्तम कामगिरी दर्शवली त्यासोबतच स्मृती मंधानाच्या क्षेत्ररक्षणाची देखील चर्चा झाली क्षेत्ररक्षण करत असताना स्मृती मंधानाने एक जबरदस्त कॅच पकडला. तिने हवेत झेप घेत अफलातून कॅच पकडला आणि सर्वांनाच चकीत केले. मंधानाने नताली सायवरला कॅच आऊट करत हाफ सेंच्युरी बनवण्यापासून रोखले. स्मृती मंधानाने घेतलेल्या या कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हवेत उडी घेत स्मृती मंधानाने अफलातून कॅच पकडला आणि सर्वानाच चकित केले. तिच्या या कॅचमुळे  इंग्लंडच्या टीमलाही धक्का बसला. नताली सायवरला दिप्ती शर्माने आऊट करत माघारी धाडले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!