🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तरसभा घेतली. या सभेत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या टीकेची चिरफाड केली. राज ठाकरे यांनी आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या खास शैलीत त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला.
शरद पवार, संजय राऊत, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला. राज ठाकरे यांच्यावर महाविकासआघाडीतील सर्वच नेत्यांनी त्वरित उत्तर दिले होते. आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी एक ट्विट केले आहे. राज यांच्या सभेचा आणि नेत्यांनी सभेनंर दिलेल्या प्रतिक्रियांचा धागा पकडत खोत यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले होते. “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे तर तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा दिसतो ते तपासून घ्या” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.
अजित पवार म्हणाले, “अशा लोकांकडे लक्ष देण्याची गरज नाही. मी योग्य वेळी उत्तर देईन.”
आता सदाभाऊ खोत आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “राज ठाकरे यांची उत्तर सभा झाली आणि महाविकास आघाडी मधले बेवडे हर्बल गांजाचा धुर काढत फिंगा धरायला लागले.” अशा कठोर शब्दात महाविकासआघाडीवर टीका केल्याने आता सदाभाऊ आणि महाविकासआघाडी असा संघर्ष पेटण्याची शक्यता दिसत आहे .
महत्त्वाच्या बातम्या :
राज ठाकरेंवर गुन्हा दाखल, सभेत उंचावली होती तलवार
“तुम्ही फार धुरफुटे झालात, तुमचं तोंड बघा कसं सुजलंय”; आव्हाडांचा राज ठाकरेंना टोला
“सभेला गर्दी होते, पण मते मिळत नाही” आठवलेंनी राज ठाकरेंना डिवचलं
“…मविआ सरकारचाच किंवा कोणत्या नेत्याचा डाव होता का?”, सिल्व्हर ओक प्रकरणी प्रवीण दरेकरांचा सवाल
राज ठाकरे आज भाजपच्या द्वेषमूलक विचारांची तळी उचलत आहेत- रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
