चेन्नई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. या विजयासह गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला. त्यानंतर टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज 2-0 अशी जिंकत इंग्लंडची टीम भारतामध्ये दाखल झाली आहे.
भारतीय संघासाठी या दौर्यात जो रूटचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. रुटला स्टीव स्मिथ, विराट कोहली आणि केन विलियम्सन प्रमाणे जगातील सर्वोत्तम खेळाडू मानले जाते. या चौघांना सध्याच्या काळातील फॅब फोर असेही संबोधले जाते. मात्र, स्वतः रुटने आपण या तिघांच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
रुट म्हणाला, “तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंबद्दल बोलत आहात. ते तिघेही( स्मिथ, कोहली, विलियम्सन) शानदार खेळाडू आहेत व त्यांना खेळताना बघणे आनंददायी असते. त्या तिघांकडूनही तुम्ही रोज शिकत असतात. मला नाही वाटत की मी स्वतः त्यांच्या इतका महान आहे.”
रुट सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेत त्याने आपले फलंदाजी कौशल्य संपूर्ण जगाला दाखवून दिले. इंग्लंडने श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय मिळवला व इंग्लंडच्या या मालिका विजयाचा नायक रुट ठरला.
महत्वाच्या बातम्या
- ‘ऋण समाधान योजने’ला मिळाली मुदतवाढ; १६ हजार शेतकरी कर्जमुक्त
- चेन्नईतील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना मिळणार मैदानात प्रवेश पण…
- इराण, इस्रायल आणि अरब राष्ट्र संघर्षाचे रक्तरंजित पडसाद भारतावर उमटणार नाही यासाठी खबरदारी घ्यावीच लागेल – सामना अग्रलेख
- आयपीएलचे साखळी सामने महाराष्ट्रात तर, बाद फेरी अहमदाबादेत
- बडोद्याचा पराभव करत सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी तमिळनाडूने आपल्या नावे केली


