Share

SLW vs INDW : पूजा वस्त्राकरचा वर्ल्ड रेकॉर्ड; लंकेविरुद्ध ठोकलं झुंजार अर्धशतक!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघ यजमान श्रीलंकेसोबत (SLW vs INDW) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळत आहे. या सामन्यात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. एका क्षणी भारताने १२४ धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या. मात्र, यानंतर पूजा वस्त्राकरने आठव्या क्रमांकावर येऊन अर्धशतकी खेळी खेळून संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या खेळीसह पूजाने विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. पूजा आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वाधिक अर्धशतक झळकावणारी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

२२ वर्षीय पूजाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध ६५ चेंडूत ५६ धावांची नाबाद खेळी खेळली. यादरम्यान त्याने तीन षटकारही मारले. आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पूजाचे हे दुसरे अर्धशतक आहे. याशिवाय तिने नवव्या क्रमांकावर अर्धशतकही ठोकले आहे. पूजाने आता आठव्या क्रमांकावर किंवा त्याखालील तीन अर्धशतके केली आहेत, जो एक जागतिक विक्रम आहे. पूजापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या निकोल ब्राउनच्या नावावर होता, जिच्या नावावर दोन अर्धशतके आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणारी पूजा वस्त्राकर शहडोल या छोट्या शहरातून आली आहे. तिच्या वेगवान गोलंदाजीमुळे पूजाने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तिच्या फलंदाजीत सातत्याने सुधारणा होत आहे. धावगती वाढवण्यासाठी पूजालाही अनेकदा फलंदाजीत प्रोत्साहन दिले जाते. पूजाने ४ वर्षांच्या कारकिर्दीत २ कसोटी, २३ वनडे आणि २७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!