Share

Eknath Shinde : व्हिडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अपघातग्रस्त वारकऱ्यांशी साधला संवाद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. कालपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत. सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री  शिंदे यांनी दिले.

मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. या व्हिडिओनंतर एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच यादरम्यानचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. यानंतर शिंदे याचा आता दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. वारकऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधून चौकशी केली.

यावेळी तुम्हाला लागेल ती सर्व वैद्यकीय मदत शासनाच्या वतीने करण्यात येईल असे सांगून त्यांनी सगळ्यांना आशवस्त केले. आज खानापूर-आटपाडी मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यानी मिरज जिल्हा रुग्णालयात जाऊन या जखमी वारकऱ्यांची चौकशी केली. या दुर्घटनेत एकूण 19 वारकरी जखमी झाले होते. त्यापैकी 3 जणांना घरी सोडण्यात आले असून उर्वरित 14 लोकांवर अद्यापही उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी काल तातडीने या घटनेची दखल घेऊन मिरज येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलून या वारकऱ्यांवर लागेल ते उपचार तत्काळ करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आज पुन्हा या वारकऱ्यांची फोनवरून चौकशी करून त्याना लागेल ती सर्व मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!