Share

अंबाजोगाईत ऑक्सिजन बंद राहिल्याने सहा रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

बीड : अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहे. पण येथे अर्धातास ऑक्सिजन बंद राहिल्याने सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी आज केलाय. तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी हे आरोप फेटाळलेत.

स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील दोन आणि तीन या वार्डांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या वार्डातील ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. ऑक्सिजन बंद झाल्यानेच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही नातेवाईकांनी सांगितलं.

तर महाविद्यालयाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे की, रुग्णालयात कोरोनाच्या एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झालाय. मृतांपैकी बहुतांश रुग्णांचे वय ६० हून अधिक आहे. काही रुग्णांचा मृत्यू हा भरती होताना ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. तसेच त्यांना दमा, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन इत्यादी शारिरीक व्याधी असल्याचे दिसून आलेले आहे.

परंतु सोशल मीडियावर रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रसारित होत आहे. हे चुकीचे आहे. रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणे कामी लोखंडी सावरगाव, बीड, लातूर औरंगाबाद, नांदेड व जालना या ठिकाणाहून जम्बो सिलेंडरचा व लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्व पाठपुरावा करण्यात येत आहे. सध्या रुग्णांसाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध आहे.

आजही सकाळपासून लातूरहून ऑक्सिजन सिलेंडर मागवले. आयसीयूजवळ मी स्वतः होतो. वार्ड नंबर तीनजवळही उभा होतो. या घटनेचा पूर्ण अहवाल मी मागवला आहे. अहवाल आल्यानंतर सगळं स्पष्ट होईल, पण ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू झाल्याचं चूक आहे,” असं सांगत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!