इंग्लंड : स्पर्धेच्या एक दिवस आधी जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या सामन्यासाठी ११ शिलेदारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने या सामन्यासाठी खेळवण्यात येणाऱ्या ११ खेळाडूंची यादी जाहीर केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेला आज पासून सुरुवात होत आहे. या सामन्याला काही तसाच बाकी आहे. सगळीकडे या सामन्याची उत्सुकता लागली आहे. या सामन्यासाठी भारत आणि न्युझीलंड दोन्ही संघ साउथहॅमप्टटनमध्ये आहेत.
अंतिम सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सहा बॅट्समन आणि पाच बोलर्सच्या साथीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने अनुभवी गोलंदाजांसोबत टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्याचं ठरवलं आहे. याचमुळे इशांत शर्मा मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वेगवान गोलंदाजांना अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळली.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या वडिलांचे निधन झालेला असताना देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्तम कामगिरी करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. भारतीय संघाने या महामुकाबल्यासाठी १५ खेळाडूंची यादी जाहीर केली होती. या १५ खेळाडूंन मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्तम कामगिरी करणाऱ्या मुहम्मद सिराजचे देखील नाव होते. सर्वत्र सिराजला ११ खेळाडूंन मध्ये सामील करावे अशी अशा होती. मात्र, सिराजच्या जागी अनुभवी गोलंदाज मुहम्मद शमील ११ खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले.
अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाल्यास दमदार कामगिरी करण्याचे सिराजचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे. या सामन्यापूर्वी सिराज म्हणाला होता की, ‘मी अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उत्सुक आहे. मला माझ्या संघाला सामना जिंकवून द्यायला आवडेल, मी अशीच कामगिरी करत राहिलो, तर खूप पुढे जाईन, असे विराटने मला सांगितले आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात खेळण्यासाठी मी आतुर आहे, असेही सिराजने म्हणाला होता.
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी कर्णधार विराटाचे मोठे वक्त्यव्य, म्हणाला…
- वैजापूरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापतींसह, तीन संचालकांना ‘या’ कारणामुळे नोटीसा, राजकीय वर्तुळात खळबळ!
- सुपर न्यूमररी ते युवकांवरील गुन्हे; मराठा आरक्षणाच्या बैठकीनंतर राज्य सरकारची महत्वाची भूमिका !
- आदित्य ठाकरेंच्या पुढाकाराने मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबादचा रेस टू झिरो मोहिमेत सहभाग!
- …जेव्हा गँगस्टर नातीला खेळवतो! अरुण गवळीचा फोटो होतोय व्हायरल


