Share

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; अतुल लोंढे भाजप मंत्र्यावर संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: काल (१९ फेब्रुवारी) देशभरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील (Atul Londhe) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात पियुष गोयल छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आहेत. (Single mention of Chhatrapati Shivaji Maharaj) यावरूनच त्यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे.

“आपण आचार्य विद्यासागर महाराज म्हणालात योग्य आहे. आपण मोदीजी म्हणालात योग्य आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांना, एकेरीत “शिवाजी” का? असा उपमर्द/अपमान करण्याची हिम्मत कशी होते?”, असा सवाल अतुल लोंढे पाटील यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही त्यांनी पोस्ट केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आणि महराष्ट्राविषयी भाजप जाणूनबुजून राजकारण करत असल्याचा आरोप अगोदर पासूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केला आहे. आता त्यात पियुष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी केलेल्या एकेरी उल्लेखावरून भाजपला निशाण्यावर धरले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!