मुंबई: ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Language Pride Day) म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी आणि तिचे संवर्धन करण्यासाठी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राज्यभरात हा दिन साजरा केला जातो. याच निमित्ताने मनसेने राज्यातील नागरिकांना मराठी भाषा गौरव दिन जेवढा भव्य करता, तेवढा करा असे आवाहन (MNS Appeal) केले आहे.
मनसेच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर याबाबत पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, “आपली भाषा आहे म्हणून आपण आहोत. आपली भाषा आपल्या सर्वांना ओळख देते. त्यामुळेच आपल्या एका महान, गौरवशाली परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव त्याच जोरदारपणे साजरा झाला पाहिजे. त्यासाठी विविध प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला आयोजित करता येतील. हे इतक्या जोरदारपणे साजरे करा की तुमच्या भागातल्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे की आज मराठी भाषा गौरव दिवस आहे. त्यात जास्तीत जास्त लोक सहभागी होतील हे पहा. तो जेवढा भव्य करता येईल तितका तो करा. त्यात मराठी भाषेचं पावित्र्य राखा.”
#राजभाषा_मराठी #अभिजात_मराठी #मराठी_भाषा_गौरव_दिवस pic.twitter.com/3nCr4VDuGG
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) February 20, 2022
दरम्यान मनसेने मोठ्या प्रमाणात लोकांच्या सहभागात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे, मनसेने नेहमीच मराठी माणसाच्या हक्कांसाठी पुढाकार घेतला आहे. मनसेनी ‘मराठी माणूस आणि मराठी माणसाची प्रगती’ यासाठी नेहमीच भूमिका घेतली आहे. आता मराठी भाषा गौरव दिन मोठ्या थाटाबाटात साजरा करण्याचे आवाहना मनसेने केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- रशियात युद्धजन्य परिस्थिती; जयंत पाटलांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी
- शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘निवडून देतो म्हणजे…’
- ’ समन्सविरोधात सोमय्या आक्रमक; म्हणाले, “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी..”
- क्रिकेटच्या मैदानातही धनंजय मुंडेंची फटकेबाजी; ७ चेंडूंत केल्या ११ धावा
- सुशांतसिंगच्या मुद्द्यावरून राणेंचा पुन्हा हल्लाबोल


