🕒 1 min read
मुंबई: रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती (Russia-Ukraine war situation) निर्माण झाली आहे. युक्रेनच्या लष्कराने युद्ध सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. या पार्श्वभूमीवरच राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil ) यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (Prime Minister Narendra Modi) मागणी केली आहे.
“रशिया आणि युक्रेन सीमेवरील परिस्थिती गेल्या १५ दिवसांपासून चिघळत चालली आहे. याठिकाणी सुमारे १८ हजार भारतीय आहेत, त्यापैकी बहुतेक युक्रेनमधील विद्यार्थी आहेत, ते मदतीची वाट पाहत आहेत. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करतो की, विद्यार्थ्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावेत. ते आपले भविष्य आहेत.”, असे ट्वीट जयंत पाटील यांनी केले आहे.
The situation on the #RussiaUkraine border has been escalating for the last 15 days. There are approx 18k Indians, most of them are students in #Ukraine, waiting for the help. I request PM @narendramodi to ensure the safety of students & evacuate them asap. They are our future.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 20, 2022
दरम्यान युक्रेनच्या लष्कराने युद्ध सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांची मागणी चर्चेचा विषय ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- सुशांतसिंगच्या मुद्द्यावरून राणेंचा पुन्हा हल्लाबोल
- “त्या काळात मावळा म्हणून जन्माला आलो असतो, तर…”, उदयनराजे भोसले भावूक
- रोहित पाटील कवठेमहांकाळ निवडणुकीमुळे वादात ; पराभूत उमेदवारांची न्यायालयात धाव
- Punjab-UP Election 2022 : युपीत तिसऱ्या टप्प्यासाठी तर पंजाबमध्ये सर्व जागांसाठी आज होणार मतदान
- समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ; सद्गुरू बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
