नवी मुंबई: महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) तयारीला लागली आहे. मनसेकडून महापालिका निवडणुकांची (Municipal Corporation Election) जोरदार तयारी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठकांचे आयोजन देखील केले होते तसेच आता अमित ठाकरे देखील सक्रिय असल्याचे दिसत आहे.
आज (२० फेब्रुवारी) रोजी मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्या हस्ते नवी मुंबईतील विविध ठिकाणी शाखांचे उद्घाटन पार पडले असून, त्याच सोबत नवीमुंबई मनसे शिव जनसंपर्क अभियानाला सुरुवात करणार आहे, किमान एक लाख नवी मुंबईकरांना भेटण्याचा मानस आसल्याचे मनसे कडून सांगण्यात आले आहे.
एकंदरीतच संभ्याव महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मनसेचे हे वातावरण निर्मितीचे प्रयत्न किती कामी येतात हे येणारा काळच ठरवेल. मात्र नवी मुंबई मनसे पक्षाच्या मोठ्या नेत्याला अमित ठाकरे यांना आणून, शक्ती प्रदर्शन करत असल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
रशियात युद्धजन्य परिस्थिती; जयंत पाटलांनी केली पंतप्रधान मोदींकडे ‘ही’ मागणी
शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘निवडून देतो म्हणजे…’
‘त्या’ समन्सविरोधात सोमय्या आक्रमक; म्हणाले, “ठाकरे सरकारच्या घोटाळेबाजांनी..”
क्रिकेटच्या मैदानातही धनंजय मुंडेंची फटकेबाजी; ७ चेंडूंत केल्या ११ धावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

