Share

शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सुनावले खडेबोल; म्हणाले, ‘निवडून देतो म्हणजे…’

Published On: 

पुणे: महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शनिवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील बाणेर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला भाजपा नेते गिरीश बापट (Girish Bapat), प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil), महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्यासह अभिनेते नाना पाटेकरदेखील (Nana Patekar) उपस्थित होते. यावेळी नाना पाटेकर यांनी आपल्या भाषणादरम्यान राजकीय पक्षांना खडे बोल सुनावले.

यावेळी बोलताना नाना पाटेकर म्हणाले, आम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी अशा दोघांनाही मतं दिलेली असतात. त्यामुळे दोघांची जबाबदारी असून मत दिलं असल्याने आम्हाला बोलण्याचा हक्क आहे. आम्हाला फक्त एक दिवस नाही तर रोज हक्क असून आमच्या हिताची कामं करण्यासाठीच तुम्हाला निवडून दिलं आहे. सरकार कोणतंही असो त्याच्याशी काही देणंघेणं नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं.

निवडून देतो म्हणजे पाच वर्ष तुम्ही आमच्या गोष्टी केल्याच पाहिजेत. तुमचे कपडे मळलेले पाहिजेत. तुमच्या कपड्याला घामाचा घाण वास आला पाहिजे. हातात भाकरीचा तुकडा ठेवला तर तो गिळायची सवय पाहिजे. निवडणुकीला उभे राहा म्हणून आम्ही गुळ, खोबरं दिलं होतं का? आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे म्हटल्यावर तुमची जबाबदारी आहे. तुम्ही फकीर असलं पाहिजे. आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं, अशा शब्दात नाना पाटेकरांनी मांचावरील नेत्यांना सुनावलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!