रत्नागिरी: कोकणात राजकीयदृष्ट्या आजचा दिवस चांगलाच गाजणार आहे. कारण मविआ सरकारमधील तीन बडे नेते आज कोकण दौऱ्यावर आहेत. युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्गमध्ये, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये तर जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) चिपळूण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्ष बांधणी, कोकणात होत असलेल्या राजकीय घडामोडी, आरोप-प्रत्यारोप या पार्श्वभूमीवर या तिन्ही मंत्र्यांच्या दौऱ्याला राजकीय दृष्ट्या महत्व असणार आहे. भाजप नेते नितेश राणे यांचा गड म्हणून देवगड पाहिले जाते. पण नगरपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेला मिळालेला विजय चर्चेचा राहिला होता. आज आदित्य ठाकरे विविध ठिकाणी भेटी देतील तसेच काही कार्यक्रमांना देखील उपस्थिती लावतील.
तर नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेसोबत एकत्र निवडणुका लढवल्या. यावेळी राष्ट्रवादीच्या जागा वाढलेल्या दिसून आल्या. तर काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी देखील कोकणात भेटीगाठी केल्या. आज जयंत पाटील चिपळूण दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीही कोकणात आपले वर्चस्व बनवण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“सुसंस्कृत आणि सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी…”, अजित पवारांचे मोठे वक्तव्य
नाणार प्रकल्प पुनरुज्जीवनाच्या चर्चेवर संजय राऊतांचे स्पष्टीकरण; म्हणाले…
‘या’ तारखेला होणार पंतप्रधान मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम
“देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात…”; राष्ट्रवादीचा गोपीचंद पडळकरांवर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

