Share

‘ते’ शिवसेनेचे नाही म्हणून ते मराठी नाही का संज्या? तुझ्यासारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही

Published On: 

मुंबई: बेळगाव येथे महानगरपालिकेवर भाजप पक्ष निवडून आला आहे. यावरच भाजप नेत्यांनी राज्यात पेढे वाटून त्याचा आनंद साजरा केला. तर दुसरीकडे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी यावर नाराजी व्यक्त करत मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, अशा शब्दात बेळगावच्या भाजपच्या विजयावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावरूनच भाजप नेते नितेश राणे यांनी ट्वीट करत संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

‘संतोष पेडणेकर, जयंत जाधव, रवी धोत्रे, सविता कांबळे, रेश्मा पाटील व असे अनेक मराठी उमेदवार बेळगावात निवडून आले, हे मराठी नाही का संज्या? की फक्त शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले नाही म्हणून ते मराठी नाही?संज्या तुझ्यासारखा रड्या या जगात दुसरा सापडणार नाही. अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान बेळगाव येथे मराठी माणूस नाही तर शिवसेना हरली आहे. असा आरोप भाजपने केला आहे. तर एवढ्या वर्षांपासून तिथे प्रशासक नेमला होता. पण अचानक तिथे निवडणूक घेण्यात आली. प्रचाराला वेळ मिळू दिला नाही. हे सर्व प्रकरण पाहिल्यावर हा पराभव घडला हे दुर्दैव असलं, तरी कर्नाटकचं सरकार सीमाबांधवांचा आवाज कोणत्या पद्धतीने दडपतंय हे पाहिलं की अंगावर काटा उभा राहतो. तरीही आमचे लोक तिथे संघर्ष करतात, लाठ्या खातायत,तुरुंगात जाताय. त्याचं कौतुक करायला हवं. तर तुम्ही पेढे वाटताय? असा खोचक टोला राऊत यांनी लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!