Share

सुनेचे गंभीर आरोप, रामदास तडस यांना तात्काळ अटक करा ; रुपाली चाकणकरांची मागणी

Published On: 

पुणे : भाजपचे खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पत्नीने पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती. या तक्रारीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. परंतु आता या प्रकरणाला काहीसे वेगळे वळण लागले आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, ‘मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते’ असे विनंती त्यांनी केली आहे.

यावर रुपाली चाकणकर यांनी आता रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘मला आज सकाळी लवकरच पूजाचा फोन आला. फोनवर त्या रडत होत्या. माझ्याकडे मदतीची मागणी त्या करीत होत्या. त्यानंतर मला त्यांनी सविस्तर प्रकरण सांगितले आहे.

गेले अनेक दिवस रामदास तडस, त्यांचा मुलगा आणि तडस कुटुंबीय तिला मारहाण करत आहेत. तिच्या जीवाला धोका असल्याचं तिने मला सांगितलं. तसंच मला इथून घेऊन चला, अशी विनवणी तीने माझ्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी तात्काळ रवान झाले आहेत.

त्यांची सर्वोतोपरी मदत केली जाईल. यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं सुरु आहे. सरकार आणि पोलिसांच्या वतीने देखील तात्काळ अॅक्शन घेतली जाईल. परंतु झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे. रामदास तडस आणि कुटुंबीयांच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, अशी मागणी आता रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

दरम्यान रामदास तडस यांच्या सुनेने पोलिस महानिरीक्षकांकडे दिलेल्या या तक्रारीत खासदार रामदास तडस, त्यांची पत्नी शोभा तडस, मुलगी सुनीता तडस यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला आहे. तक्रारीत आणखी गंभीर आरोप करण्यात आल्याने यात पोलिस विभाग काय कारवाई करतो याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!