Share

रामाच्या नावाने होतंय पाप ! राम मंदिर ट्रस्टने घेतला निधी संकलनाबाबत मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

अयोध्या : ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. कोरोनाचे सावट लक्षात घेता मोजक्याच निमंत्रितांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला असला तरी जगभरातील रामभक्तांनी हा सोहळा असेल त्या ठिकाणाहून बघत या ऐतिहासिक क्षणाचा अनुभव घेतला होता.

आता, या राम मंदिराच्या प्रत्यक्ष निर्माण कार्यास देखील सुरुवात झाली आहे. तर, मंदिर उभं करण्यासाठी लागणारा खर्च हा करोडो रामभक्तांमार्फत घरोघरी जाऊन संकलित केला गेला. सर्वच क्षेत्रातून राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात दान आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यापासून ते झोपडीत उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबापर्यंत,सर्वांनीच शक्य तेवढा निधी समर्पित केला आहे. राम मंदिर निधी संकलन अभियानात विश्व हिंदू परिषदेसह भाजपने देखील सक्रिय सहभाग घेतला होता. काँग्रेसने भाजप निधी संकलनामध्ये गैरव्यवहार करत असल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यामुळे विधानसभेत मोठा वाद देखील झाला होता.

दरम्यान, घरोघरी जाऊन निधी संकलन करण्याच्या अभियानाचा काही लोक गैरफायदा घेत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे ही मोहिम बंद करण्याचा महत्वाचा निर्णय राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने घेतला आहे. मात्र, ज्यांना देणगी देण्याची इच्छा आहे त्यांना ट्रस्टच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने देणगी देता येणार आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली.

आता पर्यंत किती निधी जमा ?

देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात निधी जमा होत आहे. दरम्यान, बँकेच्या पावत्यांच्या आधारे समोर आलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारीपर्यंत अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी २५,००० मिलियन रुपये (२,५०० कोटी रुपये) देणगी मोहिमेतून जमा झाले आहेत, विश्व हिंदू परिषदेनं ही माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!