मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मेडिकल कॉलेजच्या मुद्द्यवरून भाजपा नेते व खासदार नारायण राणे यांच्यावर निशाना साधला होता. यानंतर नारायण राणेंनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार करत खोचक टीका केली आहे.
नारायण राणेंनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाच्या माध्यमातूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव घेत निशाणा साधला आहे. नारायण राणे यांच्या दैनिक प्रहार मध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचा एक किस्सा छापण्यात आला होता.
त्यामध्ये राणेंनी बाळासाहेबांना सवाल केला होता की, आपण व्यंगचित्र काढायचे कमी केले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी खास ‘ठाकरे शैली’त याचं उत्तर दिलं होतं. बाळासाहेब म्हणाले, ‘त्या उंचीची व्यक्तीमत्व आता नाहीत, आता व्यंगचित्र काढण्यासारखे चेहरे नाहीत. अब तो एक ढ़ूंढो हजार मिलते है और एक ही घर में दो दो बसते है,’ याच वक्तव्याचा आधार घेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे.
हा फक्त टोमणे मारणारा मुख्यमंत्री आहे, त्या पदाला शोभणारा माणूस नाही. ठाकरेंनी स्वतःचे पैसे लाऊन एक संस्था उभी केलेली दाखवावी. ठाकरे इतके भिकारी आहेत की आज पर्यंत पक्ष्याच्या जमवलेल्या वर्गणीतून आणि टक्केवारीतून घर चालवले. https://t.co/UN8AsXUDFJ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 6, 2021
दरम्यान, नारायण राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणे यांनी देखील उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. ‘हा फक्त टोमणे मारणारा मुख्यमंत्री आहे, त्या पदाला शोभणारा माणूस नाही. ठाकरेंनी स्वतःचे पैसे लाऊन एक संस्था उभी केलेली दाखवावी. ठाकरे इतके भिकारी आहेत की आज पर्यंत पक्ष्याच्या जमवलेल्या वर्गणीतून आणि टक्केवारीतून घर चालवले.’ अशा बोचऱ्या शब्दात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्यत्तर दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पक्वान्नाहूनही बळीराजाच्या घरातला आहार गोड लागतो’
- आज लॉकडाऊन होणार? औरंगाबादकरांचा जीव टांगणीला
- चित्रा वाघ यांचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी यवतमाळमधून एकाला अटक
- मराठा आरक्षण; सुप्रिम कोर्टात भक्कम बाजू न मांडल्यास राज्यभर आंदोलन
- शिक्षकाला मिळाली अशी शिक्षा; वृद्ध आईला मिळाला सहारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

