यवतमाळ : 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीचा वानवडी येथे संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ या सातत्याने आवाज उठवत होत्या. संजय राठोड यांचं नाव घेत त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
त्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांचे पती सोबतचे फोटो आक्षेपार्हपणे एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती. चित्रा वाघ यांच्या पती ऐवजी संजय राठोड यांचा चेहरा लावून फोटो मॉर्फिंग करण्यात आले होते. चित्रा वाघ यांनी त्या फोटोंसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती.
या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रांचने यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर पोलिसांनी एकाला अटक केली आहे. राहुल तुळशीराम आडे राहणार जरंग याला अटक केली आहे. तर, संतोष राठोड हा अद्याप फरार आहे. मुंबईच्या क्राईम ब्रांचच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान, चित्रा वाघ यांना सातत्याने धमकीचे कॉल देखील आल्याचे समोर आले होते. यासंदर्भात त्यांनी पोलिसांत तक्रार देखील दाखल खेळू असून पोलीस तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘पक्वान्नाहूनही बळीराजाच्या घरातला आहार गोड लागतो’
- आज लॉकडाऊन होणार? औरंगाबादकरांचा जीव टांगणीला
- नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिल्याबद्दल नितेश राणेंनी केले मनसेचे स्वागत
- ‘…इस सवाल का जवाब चाँद पे रहने वाले लोग भी दे सकते हैं ; अनुपम खेर यांनी घेतली ‘सोनी मॅक्स’ची फिरकी
- शिक्षकाला मिळाली अशी शिक्षा; वृद्ध आईला मिळाला सहारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

