Share

शिक्षकाला मिळाली अशी शिक्षा; वृद्ध आईला मिळाला सहारा

Published On: 

🕒 1 min read

लातूर : जिल्ह्यातील जळाकोट तालुक्यातील एका शिक्षकाला आपल्या वृद्ध आईचा संभाळ न केल्यामुळे शिक्षा मिळाली आहे. पंचायत समितीने शिक्षाकाच्या वृद्ध आईची हाक ऐकुन तिच्या शिक्षक मुलाला शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेनुसार शिक्षकाला आपल्या पगारातील ३० टक्के रक्कम आईच्या नावाने कपात करण्याचे आदेश दिले आहे.

जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात हकेवाडी येथे प्रल्हाद हावा हे शिक्षक म्हणून नोकरी करतात. जळाकोट तालुक्यात धामणगाव येथे त्यांची ८० वर्षीय वृद्ध आई भगीरथी माधव हावा राहतात. प्रल्हाद हावा हे नोकरी लागल्यापासून आपल्या आईला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत केली नाही ना तिचा सांभाळ केला. शिक्षकांच्या आईने शक्य तशी मोलमजुरी करुन आपला उदरनिर्वाह चालवला. मात्र वय झाल्याने त्यांच्याकडून काम होत नसल्याने मुलाकडे मदत करण्याची विनंती केली मात्र मुलाने दुर्लक्ष केले.

आखेर नाईलाजास्तव भगीरथी हावा यांनी शिक्षण विभागाचे दार ठोठावले. तेथे शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली. तसेच गंगाखेड पंचायत समिती व गटविकास अधिकारी यांचीही भेट घेतली. त्यांची व्यथा ऐकून गंगाखेड पंचायत समितीच्या सभापती छाया मुंडे यांनी बैठक बोलावुन शिक्षक प्रल्हाद यांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम आईच्या नावे कपात करण्याचा ठराव मांडला. आणि लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी शिक्षकांच्या वेतनातून ३० टक्के रक्कम कपात करण्याचा निर्णय घेतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!