उस्मानाबाद : मराठा आरक्षण प्रकरणी उद्या, ८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आहे. यावेळी राज्य शासनाने बाजू भक्कमपणे न मांडल्यास राज्यभर बोंबा मारो आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे. याबाबत तुळजापूर तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, उच्च न्यायालयात टिकलेल्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचा फटका मराठा युवकांना बसला आहे. यामुळे अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेकांना नोकरीपासून तसेच वैद्यकीय प्रवेशापासून वंचित रहावे लागले आहे.
मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी दि. ८ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार असून या सुनावणीत राज्य शासनाने मराठा आरक्षणाची बाजू पूर्ण ताकदीने आणि भक्कमपणे मांडण्याची मागणी मराठा समाजातून होत आहे. सुनावणीत मराठा आरक्षणावरील स्थगिती न उठल्यास राज्य सरकारच्या विरोधात राज्यभर बोंबा मारो आंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राज्य सरकार गोंधळलेले असताना कोणती चांगली काम केली?’
- आक्रमक, रांगडया शैलीतील भाषणाने आ.धस यांनी विधिमंडळात लक्ष वेधले
- शेअर बाजारात फायदा झाल्याचे सांगून इंजिनिअरला २४ लाखांना फसवले
- ‘विधिमंडळातील ‘ते’ वक्तव्य चुकीचे, मुख्यमंत्र्यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी’
- मास्क लावण्यास सांगितल्याने वाहकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
