मुंबई : मी मास्क घालतच नाही, असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माध्यमांसमोर केलं होत. तसंच नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना चेहऱ्यावरील मास्क उतरवण्यास सांगितलं होतं. एकूणच राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या भूमिकेमुळे राज्यात कोरोना वाढला असं म्हणत अॅड रत्नाकर चौरे यांनी औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कोरोनाच्या संकट काळात राज्य सरकार व प्रशासन कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करत आहेत. तसेच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यास सांगत आहे. अशा काळात एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं आवाहन करतो, तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत का? असा प्रश्न त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी तोंडाला मास्क लावला नव्हता. यावेळी ‘तुम्ही मास्क घातलेला नाही’, असं पत्रकारांनी विचारल्यावर ‘मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतोय’, असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं होतं. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी ‘त्यांना माझा नमस्कार सांगा,’ असे उत्तर दिले होते.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गर्दी टाळणं आणि मास्कचा वापर करणं हाच कोरोनापासून दूर राहण्याचा उत्तम उपाय असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे मास्क न घालताच मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. त्याबद्दल विचारलं असता त्यांनी अजब उत्तर दिलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. महापालिका प्रशासन राज ठाकरे यांच्यावर काय कारवाई करणार? असा प्रश्न विचारला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांच्या ‘त्या’ विधानाचा आधार घेत राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
- आज लॉकडाऊन होणार? औरंगाबादकरांचा जीव टांगणीला
- चित्रा वाघ यांचे ‘ते’ फोटो व्हायरल केल्याप्रकरणी यवतमाळमधून एकाला अटक
- मराठा आरक्षण; सुप्रिम कोर्टात भक्कम बाजू न मांडल्यास राज्यभर आंदोलन
- शिक्षकाला मिळाली अशी शिक्षा; वृद्ध आईला मिळाला सहारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
