Share

‘बेस्ट’ सेवा बजावणाऱ्या सिल्लोडच्या बस वाहकाचा कोरोनामुळे मृत्यू!

Published On: 

औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या बेस्ट सेवेतून आलेल्या सिल्लोड आगारातील वाहक शेकनाथ सिरसाठ यांचा कोरोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला. औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत तब्बल ९ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मुंबईच्या बेस्ट सेवेसाठी राज्यातील विविध आगारातील कर्मचारी पाठवण्यात येत आहेत.

त्यानुसार सिल्लोड आगारातील वाहक शेकनाथ शंकर सिरसाट हे बेस्ट सेवेसाठी १० एप्रिल रोजी गेले होते. आठवडाभर बेस्ट सेवेत काम करून ते १८ एप्रिल रोजी कर्तव्य बजावून परतले होते. त्यानंतर अवघ्या चारच दिवसात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांच्यावर हडको येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतांना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा व पत्नी देखील पॉझिटिव्ह आले आहेत.

तर त्यांच्या मुलीचा अहवाल येणे बाकी आहे. कोरोनामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पाठोपाठ मृत्यू होत आहेत. तीनच दिवसांपूर्वी चालक कारभारी उत्तमराव बिर्हारे यांचे निधन झाले. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात एकनाथ शिरसाठ यांना प्राण गमवावे लागले. औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत ९ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

यात मुंबई बेस्ट सेवेतून आलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापूर्वीही बस सेवा देऊन आलेल्या कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. विम्याच्या रकमेचा विषय मुख्य कार्यालयापर्यंत पाठवण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत जेवढ्या ही एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांच्या संदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती औरंगाबाद विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!