बीड : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मृतांवर अत्यंस्कार करण्यासाठीही जागा नसल्याचे समोर येत आहे. या पेक्षाही संतापजनक प्रकार बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईत घडला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या २२ रुग्णांचे मृतदेह एकाचा रुग्णवाहिकेत कोंबण्यात आले होते. या प्रकारामुळे स्वाराती रुग्णालय प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात कोरोना उद्रेक इतका वाढला आहे की, आरोग्य यंत्रणा हातश झाली आहे. दररोज हजारो नागरिक नव्याने बाधित होत आहेत. विशेषत: अंबाजोगाई तालुक्यातील परिस्थिती गंभीर आहे. त्यातच शेजारच्या सर्व तालुक्यातून रुग्ण स्वाराती रुग्णालय आणि लोखंडीच्या जम्बो कोव्हीड सेंटरमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे. वाढत्या रुग्ण संख्येसोबतच मृतांचेही प्रमाण वाढले आहे. मात्र, मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात आरोग्य यंत्रणेवरुन कायमच आरोप-प्रत्यारोप होत आहेत. मात्र, या प्रकारामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : सोनिया गांधींचा थोरातांना फोन; महाराष्ट्रातील स्थितीबाबत केली महत्वाची चर्चा
- बीड येथील धक्कादायक प्रकार; रेमेडेसिवीरच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी का केली नाही म्हणत थेट आत्महत्येचा प्रयत्न
- चांगली बातमी! परभणीत एका आठवड्यात साडेपाच हजार रुग्णांची कोरोनावर मात
- दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवलाय, आता तिसऱ्या लाटेआधी…; राजेश टोपेंच सूचक विधान
- संकटाच्या वेळी ‘मूकदर्शक’ राहू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा मागितला आराखडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

