🕒 1 min read
बीड: जिल्ह्यातील तांदळवाडी येथील साठवण तलावात एका पोत्यात महिलेचा मृतदेह असल्याची अफवा येथील परिसरात पसरली. त्यानुसार पोलिसांना देखील कळवण्यात आले. रात्री पोलीस प्रशासनाने शोध मोहीम सुरु केली असता त्यांना कुठे काही सापडले नाही बराच अंधार असल्याने त्यांनी रात्रीच्या ऐवजी सकाळी शोध मोहीम सुरु करायचे ठरवले. पुन्हा रविवारी सकाळी पोलिसांनी त्या तलावाजवळ शोध मोहीम सुरु केली तेव्हा त्यांना एक पोते सापडले. सापडलेले ते पोते पोलिसांनी उकलले असता त्यांना त्या पोत्यात फक्त साड्या व चिंध्या दिसून आल्या.
धारूर शहरापासून पूर्वेस चार किमी अंतरावर तांदळवाडी गावालगत साठवण तलाव आहे. या साठवण तलावमध्ये सध्या पाण्याचा साठा आहे. तलावात पाणी असल्यामुळे येथे काही तरुण काही दिवसांपासून मासेमारी करतात. शनिवारी सायंकाळी येथील तीन तरुण जाळ्याच्या साह्याने मासे पकडण्यासाठी तलावात गेले होते. तलावात जाळे टाकल्यानंतर त्यांना पाण्यामध्ये अचानक एक पोते स्वरूपाचे गाठोडे जाळ्यात अडकल्याचे दिसून आले. या पोत्यात महिलेचे प्रेत असल्याचा संशय त्यांना आल्यामुळे त्यांनी जाळे सोडून तेथून पळ काढला.
रात्री ९ वाजेच्या दरम्यान तांदळवाडी तलावात एका महिलेचे प्रेत पोत्यात असल्याची माहिती मासे पकडणाऱ्या तरुणांनी पोलिसांना दूरध्वनीवरून दिली. त्याच दिवशी रात्रीच्या वेळी धारूर पोलिस घटनास्थळ गाठले. त्यांनी शोधाशोध घेतली. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना इथे काहीच तपास लागला नाही, ते परतले. दुसऱ्या दिवशी सकाळी रविवारी ९ वाजता पोलिस निरीक्षक सुरेखा धस, सहायक पोलिस निरीक्षक डोलारे, जमादार गोविंद बाष्टे यांच्यासह पोलिस कर्मचारी व गावातील दहा-पंधरा तरुण या तलावाच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी तलावातील पाण्यात जाऊन पोत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
अडीच तासांच्या प्रयत्नानंतर पोते दिसून आले.
पोते दिसल्यानंतर पोते बाहेर काढण्यात आले. नंतर ते फोडण्यात आले. या वेळी त्यात गोधडी व साड्यांच्या चिंध्या असल्याचे आढळून आले. कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मृत व्यक्तीचे कपडे पोत्यात भरून तलावात टाकले असण्याचा संशय असा पोलिसांनी तर्क काढला. मात्र यामध्ये रात्रभर पोलिसांची धावपळ व गावांमध्ये महिलेचे तलावात प्रेत असल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. या पोत्याच्या गाठोड्यात चिंध्या निघाल्यानंतर सगळ्यांनी नि:श्वास सोडला.
महत्वाच्या बातम्या
- घाटीत २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू!
- अपूर्ण तयारीमुळे जिल्हाधिकाऱ्यांवर भाजप खासदार, आमदार संतापले
- कोरोनाच्या साथीतही मिळतिये गावकऱ्यांची साथ! कुसळंब येथे उभारले ५१ खाटांचे कोविड केअर सेंटर
- ऑनलाईन‘ परीक्षेपुर्वी ‘मॉकटेस्ट‘ द्यावी लागणार, बुधवारपासून चार दिवस मॉक टेस्ट
- Breaking : सोनिया गांधींचा थोरातांना फोन; महाराष्ट्रातील स्थितीबाबत केली महत्वाची चर्चा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
