Share

कोरोनाकाळात अंत्यविधीच्या नावाखाली लूट केली तर खबरदार, कृष्णप्रकाश यांचा रोखठोक इशारा

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. दरम्यान, आता राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये या लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसून येत असून रुग्ण संख्येत घट होत असून कोरोनामुक्तांचा आकडा वाढत आहे. पुणे शहरात सलग आठव्या दिवशी कोरोनामुक्तांचा आकडा हा कोरोना बाधितांपेक्षा अधिक आहे. तर, नव्या कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये देखील मोठी घट झाली आहे. मात्र अजूनही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अनेकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे.

यात सगळ्यात संतापजनक बाब म्हणजे कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका, शववाहिका आणि अंत्यविधीच्या नावाखाली भयंकर लूट सुरु आहे. मासुकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटना वारंवार समोर येत आहेत. अशात पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी या नराधमांना रोखठोक इशारा दिला आहे. कोरोनाच्या काळात रुग्णवाहिका, शववाहिका आणि अंत्यविधीच्या नावाखाली लूट केली तर त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती कृष्णप्रकाश यांनी दिली आहे. रुग्णवाहिका आणि शववाहिकेचे २५ किलोमीटर साठी ५०० रुपये ते १००० रुपये इतकेच बिल अदा करावे. यापेक्षा एक रुपयाची ही जास्तीची मागणी केली तर थेट त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांशी 9529691966. या क्रमांकावर संपर्क साधावा असं कृष्णप्रकाश यांनी जाहीर केलंय.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!