Share

औरंगाबादेत एकाच दिवसात ‘रेकॉर्डब्रेक’ साडे अकरा हजार जणांचे लसीकरण!

Published On: 

औरंगाबाद : महापालिकेच्या जम्बो कोविड लसीकरण मोहिमेत सोमवारी विक्रमी लसीकरण झाले. दोन दिवसांच्या खंडानंतर लसीकरण मोहीम सुरू झाल्याने सोमवारी सर्वच केंद्रावर नागरिकांच्या रांगा दिसून आल्या. दिवसभरात तब्बल ११ हजार ६११ जणांची लसीकरण झाले. मागील दोन महिन्यात एका दिवसात झालेले सर्वाधिक लसीकरण आहे.

शहरात १६ जानेवारीपासून प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. आत्तापर्यंत लसीकरणाने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्याचप्रमाणे दररोज सहा ते सात हजार जणांना लाभ देण्यात येत आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी लसींचा साठा संपल्याने लसीकरण थांबले होते. दोन दिवसांच्या खंडानंतर सोमवारी सर्व ११५ केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू झाली. त्यामुळे सर्वच केंद्रांवर नागरिकांनी लाभ घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे.

त्यामुळे पालिकेने सुरुवातीपासून लसीकरण मोहिम प्रभावीपणे सुरू केली आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना सौम्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी मनपाने नियोजन केले आहे. सोमवारी दिवसभरात ४९७४ इतक्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस टोचण्यात आली. त्यापाठोपाठ साठ वर्षांवरील ४०८९ तर १८४५ फ्रंटलाइन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण झाले अशी माहिती मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी दिली.

दुपारनंतर संपला साठा

महापालिकेला २५ हजार लस मिळाल्या असल्या तरीही प्रत्येक केंद्रात ठरल्याप्रमाणे साठा दिला जातो. सोमवारी अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाली दुपारीच अनेक केंद्रांवरील लसींचा साठा संपला होता. त्यामुळे अनेकांना आल्यापावली परत फिरावे लागले. आयएमए हॉल, विजय नगर, शिवाजीनगर, औरंगपुरा, समर्थनगर, सिडको-हडको भागातील केंद्रावर दुपारनंतर लस संपल्याचे बोर्ड लागले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!