मुंबई : सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.यामुळे भारतीय नौदलाची शक्ती आणखी वाढली आहे.
करंज पाणबुडीला मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं. फ्रान्सच्या मदतीने आयएनएस करंजची माजगाव डॉकयार्डने (एमडीएल) निर्मिती करण्यात आली आहे.
१५६५ टन वजनाची ‘INS करंज’ ७० मीटर लांब, १२ मीटर उंच आहे. क्षेपणास्त्र आणि टॉरपीडोजने सज्ज असलेली ही पाणबुडी समुद्रात सुरुंग पेरण्यासही सक्षम आहे. समुद्रात रडारला चकवून हल्ला करण्याची क्षमता हे ‘INS करंज’चे सर्वात मोठे वैशिष्टय आहे.
Scorpene-class submarine INS Karanj commissioned into Indian Navy in Mumbai, in presence of Chief of Naval Staff Admiral Karambir Singh and Admiral (Retired) VS Shekhawat pic.twitter.com/8Sk520fhzR
— ANI (@ANI) March 10, 2021
AIP सिस्टिममुळे पाणबुडीला वातावरणातील ऑक्सिजनची आवश्यकता भासणार नाही. एआयपी सिस्टिम असलेल्या पाणबुडीला बॅटरी चार्ज करण्यासाठी समुद्राच्या पुष्ठभागावर येण्याची आवश्यकता नाही. बराचकाळ ही पाणबुडी पाण्याखाली राहू शकते.
केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत स्वदेशी बनावटीच्या सहा पाणबुड्यांची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात येतेय. त्यापैकीच एक असलेली आयएनएस करंज सर्व यशस्वी चाचण्यांनतर आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री साहेब… तुमच्या वाहतूक पोलिसांना भिक मागायचे धंदे सोडून द्यायला सांगा’
- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले धनंजय गावडे कोण आहेत ?
- मराठा आरक्षण : संयम दाखवत असलेल्या मराठा समाजाला नेमकं कोण फसवत आहे ?
- रुग्णसंख्या वाढली! सोयगावचे कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू
- पाचशे रुपयांवरून दोन पोलिसांत तुंबळ हाणामारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

