Share

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात फडणवीसांनी गंभीर आरोप केलेले धनंजय गावडे कोण आहेत ?

Published On: 

मुंबई- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच धनंजय विठ्ठल गावडे या नावाच्या व्यक्तीवर देखील फडणवीस यांनी गंभीर आरोप केले.

“मनसुख हिरेन यांची गावडेंच्या परिसरात गाडीत हत्या केल्यानंतर खाडीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याचा आम्हाला संशय आहे असं फडणवीस यांनी म्हटल्याने गावडे चर्चेत आले आहेत.

धनंजय गावडे हे वसई-विरार महापालिकेतील शिवसेनेचे नालासोपारा येथील माजी नगरसेवक आहेत. त्यांनी पालिकेत गटनेता, स्थायी समिती सदस्य ही पदं भूषवली आहेत. ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुखही होते. बनावट कागदपत्रांच्या मदतीने जमीन हडपल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. त्यामुळे २०१७ मध्ये त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.

नोटबंदीच्या काळात गावडे यांच्याकडे १ कोटी २२ लाख रुपये मूल्य असलेल्या नव्या नोटा सापडल्या होत्या. प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आणि नालासोपारा गुन्हे शाखेनं त्यांना सापळा रचून रंगेहाथ अटक केली होती.धनंजय गावडे यांच्यावर फसवणूक, खंडणी आणि बलात्कारासारखे गंभीर गुन्हे आहेत.

त्यांच्यावर काही बिल्डरांनी ब्लॅकमेल करत असल्याचा देखील आरोप केला होता. भाईंदर येथील एका विकासकाकडून २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. २०१६ मध्ये प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांच्या घरी छापे मारले होते. त्यावेळी त्यांच्याकडून ४० लाख रुपये हस्तगत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!