उस्मानाबाद : जिल्ह्यात भाजीपाल्याची आवक चांगलीच वाढली आहे. त्यामुळे उस्मानाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात टोमॅटो जवळपास ५० रुपये किलोने विक्री होत होते. मात्र, आता परिस्थिती अशी आहे की सध्या १० रुपये किलोनेही ग्राहक टोमॅटो खरेदी करायला टाळाटाळ करत आहेत. त्याचबरोबर कोबी, पालक, मेथी, कोथिंबिरीची भाव घसरलेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा दमदार पाऊस झाला. तसेच सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. यामुळे खरीप हंगामातील विविध पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे टोमॅटोसह सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढले होते. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोसह विविध भाजीपाला पिकवून बाजारपेठेत आणला. पण आता टोमॅटो, कोबी, पालक, मेथी, काकडीसह इतर भाजीपाल्याची आवक बाजारात वाढली आहे.
यामुळे बाजार समितीत टोमॅटोची प्रति किलो ३ ते ५ रुपये तर किरकोळ बाजारात ५ ते १० रुपये किलोने विक्री होत आहे. तसेच पानकोबीची ५ ते ७ रुपये किलोने ठोक विक्री होत आहे. किरकोळ बाजारात १० ते २० रुपये किलोने विक्री होत आहे. अत्यल्प भावामुळे मशागतीचा खर्च तर सोडा शेतातून बाजारात माल आणायचे भाडेही निघत नसल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.
दरम्यान, सध्या कांद्याचे दर चांगलेच वाढलेत. अतिवृष्टीने कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी बाजारपेठेत कांद्याचे वांदे झालेत. व्यापाऱ्यांनी कांद्याची साठवणूक केल्याने भाववाढीचा सर्वात जास्त फायदा त्यांनाच मिळतोय. बाजारात ४० ते ६० रुपयांपर्यत प्रति किलो कांदा विकला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राष्ट्रवादीचे आ.संदिप क्षीरसागर यांचे राजकारण स्वार्थी’
- लस घेतल्यानंतरही बीडच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना
- बीडच्या वेअर हाऊसमध्ये अग्नितांडव! तब्बल ७५ कोटींचे नुकसान
- ‘टेस्ट करण्यापेक्षा व्यापाऱ्यांना कोरोना लस द्या’
- पंकजा मुंडेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर धनंजय मुंडेंची मंत्रीपदासोबत आमदारकी जाऊ शकते का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
