मुंबई- राज्यात मागील काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. पुजाने आत्महत्या केल्यानंतर मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आलं होतं. त्यानंतर राज्यात विरोधी पक्ष भाजपाने हा मुद्दा उचलून धरल्याने अखेर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.
यापुर्वी काही आठवड्यांपुर्वी एका महिलेने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. पण ते प्रकरण मुंडेंच्या फेसबूक पोस्टनंतर आणि तक्रार मागे घेतल्यानंतर काही प्रमाणात निवळलं होतं. सोशल मीडियावरही धनंजय मुंडेना काही प्रमाणात समर्थन मिळाले होते. मात्र आता संजय राठोंडांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेच्या राजीनाम्याची मागणी होत आहे
एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी केली.यानंतर आता भाजप अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, राठोड यांच्या नंतर आता धनंजय मुंडे यांची विकेट पडणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र संबंधित महिलेनेच मुंडे यांच्या विरोधातील तक्रार मागे घेतल्याने राजीनामा घेतला जाण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय खा. शरद पवार यांचा देखील मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.पंकजा मुंडे यांनी ही मागणी करतानाचे टायमिंग देखील चुकले असल्याची चर्चा आहे.
लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप करत असताना त्याचवेळी तत्कालीन भाजपचेच नेते कृष्णा हेगडे यांनी समोर येत याच महिलेवर आरोप केले. 2010 मध्ये या महिलेने आपल्यालाही त्रास दिला होता, असा आरोप त्यांनी केल्याने भाजपच्या मागणीतील हवाच निघून गेली होती.याशिवाय मुख्य म्हणजे भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाविषयी सावध भूमिका घेतली. भाजपच्या इतर नेत्यांप्रमाणे त्यांनी तेव्हा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची म्हणावी अशी ठामपणे मागणी केली नाही.
दरम्यान, असे असले तरीही धनंजय मुंडे यांनी ऑक्टोबर 2019 विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्याला विवाहबाह्य संबंधातून दोन अपत्य असल्याची माहिती दिली नसल्याने ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग याची दखल घेऊ शकतो. याशिवाय नैतिकता या मुद्याच्या आधारे देखील मुंडे यांना भाजप राजीनामा देण्यासाठी भाग पडू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- ‘त्या’ तरुणाचा खून समलैंगिक संबंधांतून; लग्न ठरले म्हणून पार्टनरला संपवले
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर

