Share

लस घेतल्यानंतरही बीडच्या आरोग्य अधिकाऱ्यांना कोरोना

Published On: 

बीड : कोरोना लस घेतल्यानंतर उस्मानाबादचे जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. यानंतर आता बीडचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांचा कोरोना अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला. विशेष म्हणजे १८ दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना लस घेतली होती. सध्या ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना बीडमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना करून कोरोनाला वेशीवर रोखण्यात ग्रामीण आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्वाची होती. चेक पोस्ट तपासणी, हॉटस्पॉट भागात जाऊन पाहणी करणे अशी कामे आरोग्य अधिकारी पवार यांनी केली होती. पण सुदैवाने त्यांना कोरोनाने घेरले नाही. एक महिन्यापूर्वीच त्यांनी कोरोना टेस्ट केली होती. मात्र, त्यावेळी त्यांची निगेटिव्ह आली होती.

पण काल सोमवारी थोडा त्रास जाणवल्याने त्यांनी अँटीजन टेस्ट केली. यात ते पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे. डॉ. पवार यांनी 12 फेब्रुवारी रोजी जिल्हा रुग्णलयात लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेतली होती. दुसरा डोस घेण्यापूर्वीच ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!