बीड : बीड शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. या अनुषंगाने व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी बीड शहर व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट न करता सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस द्यावी अशी मागणी केली आहे.
व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, बीड शहरात ज्या व्यापाऱ्यांना कोरोनाची लक्षणे आढळून येतात ते स्वत:हून तपासणी करून घेतात. कोरोनाबाधित आढळून आले तर कुटुंबापासून अलिप्त विलगीकरणात राहून कोरोनाचे उपचार घेतात. त्यामुळे बीड शहरातील व्यापाऱ्यांना अँटिजन टेस्टचे निर्बंध लादू नयेत. शहरातील व्यापाऱ्यांचाही या टेस्टला विरोध आहे. वर्षभरापूर्वी कोरोनाच्या संसर्गामुळे व्यापाऱ्यांची कधी दुकाने सुरू राहिली तर कधी बंद होती. लॉकडाऊनच्या काळात व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला.
बीड शहरात व्यापाऱ्यांची सरसकट अँटिजन टेस्ट करण्यापेक्षा कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे. याचा व्यापाऱ्यांना फायदा होईल. तरच बीड शहर कोरानामुक्त होईल. व्यापाऱ्यांच्या लसीकरणासाठी व्यापारी महासंघ सहकार्य करेल, असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून सांगण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मराठवाड्यात ६४७ नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद; ८ बाधितांचा मृत्यू
- हिंगोलीत जिल्ह्यात ७ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर; बाहेरगावहून आलेले ४ प्रवासी पॉझिटिव्ह
- ठिय्या आंदोलनाचा ४२ वा दिवस; ७ मार्च रोजी होणाऱ्या आक्रोश मोर्चाची जय्यत तयारी
- अर्ध्यावरती डाव मोडला.. कारच्या धडकेत पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
- मोबाइल टॉवरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
