Share

‘राष्ट्रवादीचे आ.संदिप क्षीरसागर यांचे राजकारण स्वार्थी’

Published On: 

बीड : अमृत अटल योजनेमुळे बीड शहरातील पाण्याची समस्या कायमस्वरुपी मिटणार आहे. त्यामुळे शहराला पुढच्या काळात टॅंकरची वाट पाहावी लागणार नाही. या योजनेमुळे शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. मागील काही काळात आ.संदिप क्षीरसागर यांच्याकडून विकासाची कामे वाढवली जात होती. राजकीय स्पर्धा ही विकास कामासाठी असावी विकास कामे अडवण्यासाठी नसावी. पण आमदार क्षीरसागर हे हे विकासासाठी नव्हे तर स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचा आरोप बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केला.

नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी प्रभाग क्रमांक ११ मधील अमराई भागातील नागरीकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी या भागात सिमेंट काँक्रिट रस्ता व नालीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी ते म्हणाले की, विकासाची कामे करणे हे आमचे कर्तव्यच आहे. त्यामुळे भविष्यात देखील असेच विकासाचे कामे करत राहणार आहे. या भागात खूप मोठ्या प्रमाणात गरीब नागरिक राहतात. त्या नागरिकांनी पंतप्रधान घरकुल साठी जास्तीत जास्त अर्ज करण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांनी विकास कामे करणाऱ्यांना साथ द्यावी,असे सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!