Share

बीडच्या वेअर हाऊसमध्ये अग्नितांडव! तब्बल ७५ कोटींचे नुकसान

Published On: 

🕒 1 min read

बीड : बीड जवळील पारगाव जप्ती येथे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. गावातील राज वेअर हाऊसमध्ये कापसाच्या गाठी ठेवण्यात आल्या होत्या. आज मंगळवारी पहाटे लागलेल्या आगीत तब्बल ७५ कोटी रुपयांच्या कापसाच्या गाठी जळून खाक झाल्यात. बीड-जालना महामार्गावर असलेल्या पारगाव जप्ती येथे हा प्रकार घडला. १२ तासानंतरही ही आग विझवण्यास अग्निशामक दलाला यश आलेले नाही.

बीड शहरापासून जवळच पारगाव जप्ती येथे राजवेअर नावाचे हाऊस आहे. या हाऊसमध्ये मंगळवारी पहाटच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीत बुलढाणा अर्बनमार्फत ठेवलेल्या कापसाच्या 23 हजार गाठी व इतर सहा ते सात हजार अशा एकूण 30 हजार गाठी जळून खाक झाल्या आहेत. तसेच चाळीस हजार स्क्वेअऱ फुटचे गोडावून या आगीत जळून खाक झाले आहे.

ही आग एवढी भीषण होती की अग्नीशामक दलाला ती १२ तासानंतरही आटोक्यात आणण्यास यश आले नाही. बीड, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यातून अग्निशामक दलाच्या जवळपास २५ गाड्या ही आग विझवण्यासाठी दाखल झाल्या होत्या. या सर्व गाड्यांना अद्याप आगीवर नियंत्रण मिळविता आलेले नाही.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!