Share

90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस,‘या’ जिल्ह्यात रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश

Published On: 

रायगड – राज्यात सध्या कोरोनाचा सर्वत्र कहर पाहायला मिळत आहे. यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा देखील जाणवत आहे. अतीगंभीर कोरोना रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देऊन त्यांना बरे केले जाते.मात्र रायगड जिल्ह्यात पुरवलेल्या रेमडेसिवीरचा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रायगडमध्ये या इंजेक्शनच्या वापरामुळे अनेक रुग्णांवर दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने रायगड जिल्ह्यात तात्काळ रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हेटेरो हेल्थकेअर कम्पनिकडून वितरित करण्यात आलेल्या या रेमेडिसीवीरचा वापर थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे.

रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाने हे आदेश दिले आहेत. दरम्यान, जिल्ह्यासाठी ५०० इंजेक्शन पुरविण्यात आले होते, त्यापैकी १२० इंजेक्शन देण्यात आली आहेत. इंजेक्शन दिल्यानंतर यातील 90 जणांना अचानक त्रास जाणवू लागला. याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती मिळाल्यानंतर शासनाकडे याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर 28 एप्रिल रोजी आलेली रेमडेसिवीर इंजेक्शन बॅच मधील इंजेक्शन देऊ नका, असे पत्र अन्न व औषध विभागाकडून काढण्यात आले आहे.

दरम्यान, आतापर्यंत कोरोनाच्या उपचारात रेमडेसिविर इंजेक्शन प्रभावी ठरताना दिसून आले होते. मात्र, या ताज्या घटनेमुळे आता रेमडेसिविरच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!