Share

इस्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात दुर्घटना, ३० जणांचा मृत्यू

Published On: 

नवी दिल्ली : इस्रायलमध्ये माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सवात जवळपास ३० हजार नागरिक जमले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३० नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर इस्रायलमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आणि शुक्रवारी बॉनफायर या धार्मिक उत्सावाचं आयोजन करण्यात आलं. या उत्सवाच्या दरम्यान हजारोंची गर्दी जमली आणि चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. या चेंगराचेगंरीत आतापर्यंत 30 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत.

माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सव दरवर्षी भरवण्यात येतो. यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होतात. या दरम्यान नृत्याचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. हजारो लोक यासाठी उपस्थित राहिले. ही गर्दी आटोक्यात आणता आली नाही आणि त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीमुळे ३० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

खूप गर्दी झाल्याने घटनास्थळावरील एक भाग कोसळला. हा भाग कोसळल्याचं एमडीएच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पोलिस सूत्रांनी हारेत्झ वृत्तपत्राला सांगितले की, ‘काही भाविक सीडीच्या पायऱ्या चढत असताना खाली सटकले त्यामुळे लोक खाली पडून चेंगराचेंगरी झाली.’ कोरोना व्हायरसच्या प्रकोपानंतर माउंट मेरॉनवर आयोजित लाग बी ओमर हा मोठा उत्सव होता. विषाणूचा धोका असूनही, हजारो लोक या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून मेरॉन येथे आले होते. याच उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाली.

इस्रायल हा जगातील पहिलाच देश आहे जो कोरोनामुक्त झाला आहे. इस्त्रायलमध्ये सर्वाधिक प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे त्या देशात बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्या देशातील अनेक नागरिकांनी गेल्या काही दिवसांपासून मास्कचा वापरही बंद केला आहे. घडलेली घटना अतिशय दु:खद असून मी मृत आणि जखमी व्यक्तींसाठी प्रार्थना करतो, असं ट्विट पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!