🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात शनिवारी कोरोना लसीकरण पार पडले. पहिल्या दिवशी आरोग्य विभागातील ६४७ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली. मात्र लस घेतलेल्या काही आरोग्य सेविकांना त्रास होत असल्याचे दिसतेय.
शहरात घाटी रुग्णालयासह एन-८ आरोग्य केंद्र, एन- ११ आरोग्य केंद्र, भीमनगर आरोग्य केंद्र, सादात नगर आरोग्य केंद्र, बन्सीलालनगर आरोग्य केंद्र या ठिकाणी लसीकरण करण्यात आले. एका खासगी रुग्णालयातील आरोग्य सेविका मानसी कुलकर्णी (रा. एन 11, हडको) यांनाही कोविड योद्धा म्हणून लस देण्यात आली. लसीकरणानंतर अर्धा तास त्यांना आरोग्य केंद्रात निरिक्षणाखाली ठेवण्यात आले. त्यावेळी कुलकर्णी यांना कोणताही त्रास झाला नाही. मात्र, घरी गेल्यावर काही तासानंतर त्रास जाणवू लागला.
कोरोना लसीकरणानंतर प्रतिक्रिया देताना मानसी कुलकर्णी म्हणाल्या, ”आमच्या खासगी रुग्णालयातील जवळपास 30 जणांनी शनिवारी लस घेतली. लस घेतल्यावर काही झाले नाही. मात्र दुपारनंतर अंग जड पडले. तसेच पोट आणि पाय दुखू लागले. इतरांची चौकशी केली असता त्यांनीही अशाच प्रकारचा त्रास होत असल्याचे सांगितले. सुरुवातीला काही काळासाठी त्रास होत असेल असे समजून आम्ही दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्या दिवशीही म्हणजेच रविवारी देखील त्रास होतच होता. रविवारी दिवसभर अंग दुखत होते. परंतू वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अगोदरच सांगितले होते की, थोडा साईडइफेक्ट होईल. पण 24 तासांहून अधिक वेळ झाला तरी त्रास होतच आहे. माझ्यासह सहकारी कर्मचाऱ्यांनाही असाच त्रास जाणवत आहे.”
आपण आरोग्य केंद्रांशी संपर्क साधला नाही का असा प्रश्न विचारल्यावर कुलकर्णी म्हणाल्या, ”आरोग्य केंद्रात काही त्रास जाणवल्यास संपर्क साधण्यासाठी एक मोबाईल क्रमांक लिहिण्यात आला होता. मात्र, तिथे असताना तब्येत ठिक होती. त्यामुळे तो नंबर सेव्ह केला नाही. आणखीन जास्त त्रास झाल्यास मनपाच्या वैद्यकिय अधिकाऱ्याशी संपर्क करेल.”
कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनूसार, त्यांच्यासह अनेकांना लसीकरण केल्यानंतर सौम्य लक्षणे दिसून आले. मात्र, 36 तासानंतरही आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. याकडे आरोग्य यंत्रणा आणि महापालिका प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यायला हवे.
महत्वाच्या बातम्या
- औरंगजेब दुष्ट होता, मुस्लिमांनाही त्याच्याविषयी राग-चंद्रकांत खैरे
- धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप
- उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी
- आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक
- कृषी कायद्यांविरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार रस्त्यावर उतरणार!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
