Share

औरंगजेब दुष्ट होता, मुस्लिमांनाही त्याच्याविषयी राग-चंद्रकांत खैरे

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावर ‘सामना’तून काँग्रेस पक्षावर निशाणा साधण्यात आला होता. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धीपत्रक काढून प्रत्युत्तर दिले.नामांतराचे राजकारण कोणाला प्रिय? पाच वर्षे सत्तेत असलेलेच ढोंगीपणा करत आहेत? असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेसोबत भाजपावरही निशाणा साधला आहे. यावर औरंगजेब हा अत्यंत दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी राग आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ‘महाराष्ट्र देशा’ला दिली आहे.

औरंगाबादचे नामांतर हा अस्मितेचा प्रश्न आहे. औरंगाबादचे नामांतर झाल्यास आपली मुस्लीम मते जातील, हा गैरसमज काँग्रेस पक्षाने मनातून काढून टाकावा, असेही चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, ‘बाळासाहेब थोरात हे माझे मित्र आहेत. त्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, औरंगजेब दुष्ट राजा होता. मुस्लीम समाजालाही त्याच्याविषयी प्रेम नाही. त्यामुळे औरंगाबादच्या नामांतरामुळे मुस्लीम व्होट बँकेला धक्का बसण्याची भीती काँग्रेसने बाळगू नये’ असे ते म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी ही गोष्ट फार मनाला लावून घेऊ नये. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात एकत्र बसून या सगळ्यातून मार्ग काढतील. पण, औरंगाबादचे नामांतर होणार म्हणजे होणार, हे निश्चित आहे. आगामी काळात काँग्रेस नामांतराला विरोध करणार नाही, असा विश्वास मला वाटत असल्याचे चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!