Share

धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे; ‘त्या’ महिलेचा गंभीर आरोप

Published On: 

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे एका महिलेने केलेल्या आरोपामुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. तक्रारदार महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यामुळे मुंडे यांच्यासोबतच पक्षाच्या नेत्यांना देखील टीकेचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे तक्रारदार महिलेकडून मला आणि माझ्या वकिलांना जीवे मारण्याचीही धमकी मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे. मुंडे यांचे प्रकरण बाहेर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

या मुद्द्यावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी मुख्य विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जात आहे. परंतु चौकशी पूर्ण झाल्यावर निर्णय घेऊ असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पलटी मारली आहे.

धनंजय मुंडे व्हिडिओ कॉलवरही शरीर संबंधाची मागणी करायचे. त्यांनी व्हिडिओ कॉल केल्यानंतर अनेकदा शरीर संबंध करण्याचे प्रकार याआधीही माझ्याबाबतीत घडले आहेत. माझे अतिशय खासगी आणि आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ हे धनंजय मुंडे यांच्याकडे आजही आहेत. केवळ याच गोष्टीमुळे अनेकदा अन्याय होऊनही मी गेल्या अनेक वर्षात गप्प राहिले. माझे खासगी फोटो आणि व्हिडिओंमुळे मला गप्प रहावे लागली अशी माहिती या महिलेने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

केवळ सांत्वना दाखवून, मला विश्वास देऊन माझा वारंवार वापर करण्यता आला. पण या प्रकारामुळे माझे संपुर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले. लग्नाच वचन देऊन माझा वारंवार असा वापर झाला, असा खळबळजनक आरोप धनंजय मुंडे यांच्यावर तक्रारदार महिलेने केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!