Share

आंदोलनाची पुढील रणनीतीसाठी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची तातडीची बैठक

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या आंदोलनास ५० दिवसांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. मात्र, या प्रकरणी अद्यापही तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे.

सर्वोच्च न्यायालयाने याकडे लक्ष देत चार सदस्यीय समितीची देखील नेमणूक केली आहे. मात्र या समितीसमोर जाण्यास आंदोलक शेतकऱ्यांनी नकाल दर्शवला आहे. शेतकरी संघटना कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

दरम्यान या शेतकरी आंदोलनाचा आज ५३ वा दिवस असून आज दुपारी ‘संयुक्त किसान मोर्चा’ची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर २६ जानेवारी रोजी होणाऱ्या ट्रॅक्टर परेडसंदर्भात देखील नियोजन करणार असून आज सिंघु बॉर्डरवर संयुक्त किसान मोर्चाची बैठक पार पडणार आहे.

तीन केंद्रीय मंत्र्यांसोबत शुक्रावारी पार पडलेल्या बैठकीत शेतकरी तीनही कृषी कायदे रद्द करण्याच्या आपल्या मागणीवर ठाम राहिले.साधारण चार ते पाच तास चाललेल्या बैठकीत अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे येणारी पुढील बैठक १९ जानेवारी रोजी पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!