Share

उस्मानाबादच्या १६८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला लवकरच मंजुरी

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद :उस्मानाबाद शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी येथील खासदार, आमदार चांगला पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला शासनाकडून तसेच माझ्या नगरविकास विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य राहील. उस्मानाबादच्या भुयारी गटार योजनेच्या मंत्रालयात दाखल १६८ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी देण्यात येईल, असा शब्द राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

उस्मानाबाद नगरपरिषदेच्या वतीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत उस्मानाबाद शहर पाणी पुरवठा योजनेच्या ५०.२६ कोटी रुपयांच्या योजनेचे लोकार्पण मंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री शिंदे यांनी उस्मानाबादच्या भुयारी गटार योजनेच्या १६८ कोटींच्या डीपीआरला लवकरच मंजूरी दिली जाईल, शहराच्या वाढीव लोकसंख्येचा विचार करता समांतर पाणीपुरवठा योजनेलाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रिक्त पदे भरणे, उमरगा येथील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात येईल,असे यावेळी सांगितले.

याचबरोबर त्यांच्या मंत्रालयांतर्गत नसलेल्या परंतु जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा कृष्णा भीमा सिंचन प्रकल्पाच्या लवकरात लवकर पूर्णत्वासाठी व विद्यापीठ उपकेंद्राच्या पूर्ण विद्यापीठ निर्मितीसाठी संबधित मंत्र्यांशी बोलून यासाठीही जिल्ह्यातील आमदार, खासदारांना पाठबळ दिले जाईल असे सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!