मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सतत नवे खुलासे सामोरे आले, आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसापूर्वीच एनसीबीने सुशांत सिंह रजपूत मृत्यू प्रकरणात त्याचा मित्र सिद्धार्थ पिठानीला अटक केली होती. मात्र २६ जूनला सिद्धार्थचं लग्न असल्याने त्याने लग्नासाठी कोर्टाकडे जामिनाची मागणी केली होती. यासाठी त्याला १० दिवसांचा जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सिद्धार्थला लग्न समारंभासाठी ८ जून ते २ जुलै दरम्यान अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. या शिवाय सिद्धार्थने २ जुलैला सरेंडर होण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे. सिद्धार्थच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील हालचालींवर लक्ष ठेवून त्याचा तपास केला आणिअ अखेर त्याला २८ जुलैला हैदराबादमधून अटक करण्यात आली होती.
https://www.instagram.com/p/CO2BpC1pYlR/?utm_source=ig_embed&ig_rid=324e721e-9ef1-495d-bb09-4614e32bcf8e
सुशांत सिंह राजपूतने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली तेव्हा सिद्धार्थ घरातच होता. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह पहिल्यांदा सिद्धार्थने पाहायला असल्याचे सांगण्यात येते. सिद्धार्थ आणि सुशांत रुममेट असल्याने त्यांच्यात घट्ट मैत्री होती.
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती वर संशय घेण्यात आला होता. रियाची चौकशी करत असताना ड्रग्स प्रकरणात रियाला आणि तिच्या भावाला एनसीबीने ताब्यात घेतलं. मात्र सुशांतच्या आत्महत्येला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले असून, याबाबत अजूनही काय ठोस पुरावे समोर आले नाही. त्याचे कुटुंब देखील त्याला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सुशांत सिह राजपूतने वांद्रे इथल्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती.
महत्वाच्या बातम्या
- जम्मू -काश्मिर मधील विद्यार्थ्यांसाठी अक्षय कुमारने केली ‘इतक्या’ कोटींची मदत
- ‘…हे खेळच सांगेल’ ; WTC फायनलपूर्वी कर्णधार विल्यम्सनने दिला जिंकण्याचा इशारा
- प्रदीप शर्मा यांच्या अटकेनंतर आता आणखी काही बडे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता?
- संजय राऊतांच्या ‘सर्टिफाईड गुंडा पार्टी’वर अजितदादांचे मोठे विधान…
- टॉस जिंकल्यानंतर भारतीय संघाने ‘हा’ निर्णय घ्यावा ; हवामान पाहता गांगुलीने दिला मोलाचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

